★ Menu ★

✽ History of Tuljabhavani ✽


     Tuljapur is situated in Osmanabad district and Tuljapur is well-known for Lord Shri.It is located on the hill of "Bala ghat".The former name of Tuljapur was Chinchpur.Lord Tuljabhavani is Famous and family Deity(Kul-daiwatat) of people over all India.She is also described as the impressive and formidable Goddess in Hindu Puranas, who is known to combat demons and evil forces and maintain the moral order and righteousness in the universe. The history of the temple has been mentioned in the "skanda puran". There was a sage known as "Kardabh" After his death his wife "Anubuti" had performed a penance at the banks of river "mandakini " for Bhavani mata to look after her infant child. While performing the penance the demon known "Kukur" tried to disturb her penance during which Mata Bhavani came to the aid of "Anubuti" and killed the demon "Kukur". From that day onwards the Goddess Bhavani came to be known as Tulja Bhavani. The same place is today known as Tuljapur.Nizam or Adhilshah both were not interfaced in riligious things.There was about 5000 Peoples lived in Tuljapur at 1920.
     While going to Temple of Bhavani.There is Main gate named as "Mahadwar".After crossing "Nimbalkar Darwaja" comes the main temple. Around the temple on all four sides there is open space for revolution.A hall(Sabha-Mandap) has eight-column and On west direction there is sanctum(Gabhara).Small images of different gods and goddess are carved on the stones.Also Gabhara is build by stones.
     In center of 2æthat Sanctum we saw an idol(Devi).The idol is carved out by special black stone named as Gandhakee.Which we find in River Gandhakee.She has eight hands.Near the right shoulder there is moon and near the left shoulder the sun is carved. The idol has eight hands. Various types of weapons are in her palms.In one of her right palms she holds a trishoola (a three pointed spear) which she has stabbed in the chest of a demon Mahishasura. Her right foot is pressed on the demon. The left leg is straight on the ground. Between her two legs there is the beheaded head of a male-buffalo.
     During the period of Aswin Chitra Pratipada to Astami,Paus Shudha Pratipada to Ashtami and Bhadrapad vadya Astami to Amawasya She moves towards palanga.

✽ तुळजाभवानीविषयी माहिती ✽


उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पूराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त हिन्दुस्तनतच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.
     भारतीय संस्कृतीचे प्राचीन महाकाव्य म्हणून गणल्या गेलेल्या पुराणात तुळजाभवानी देवीबद्दल अत्यंत भक्तीभावयुक्त अनेक उल्लेख आहेत. मार्कंडेय पुराणाच्या "दुर्गा सप्तशती" या खंडात एकूण तेरा अध्यायात ७०० श्लोकातून देवीच्या दिव्य शक्तीचे वर्णन केले गेले आहे. देवीने महिषासुर नामक दैत्याचा वध कसा केला याचे सविस्तर वर्णन मार्कंडेय पुराणात आले आहे. शके १८२० मध्ये देवीचे अनन्य भक्त पांडुरंग जनार्धन यांनी ३६ अध्यायात व २६०५ ओव्यात महिषासुर संहाराच्या कथेचे मूळ संस्कृत मधून रसाळ मराठीत भाषांतर केले आहे. युगायुगा पासून तुळजाभवानी देवीची महती, अनेक नाम संकीर्तनातून, लोकनाट्यातून, लोककथांतून व कवनातून अतिशय सविस्तरपणे वर्णिली जात असून देवीची स्फूर्तीदायी कथा ही राष्ट्राच्या आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय अस्मितेचा अखंड प्रेरणा स्रोत ठरली आहे. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या समकालीन संतांनी तुळजाभवानी देवीस "मनुष्याच्या दुर्बलतेची विनाशका" मानले तर योगी अरविंदांनी देवीस राष्ट्रीयतेची भावना चेतविणारी प्रेरणा मानले.
     उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे.व सोलापूर येथून ४५कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे. कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाब्तीत हस्तक्षेप करीत नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे 5000 एव्हडी होती.
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.
स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥ घेता चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥
     या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूध झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देविने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर दूस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशुल खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मांर्केडेय ऋषीची मुर्ती दिसते. देविच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सुर्य कोरलेला दिसतो.देविला स्पर्श कोणालाही करता येत नाही.देवीला पूर्वी 3 वेळा पूजा केली जात. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देविचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देविची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)
सभामंड्प ओलांडून गेल्यावर पुर्वेला भवानी शंकराची वरदमुर्ती ,शंकराचे स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह ,खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मुर्ति दृष्टीस पडतात.
येथील काही प्रेक्षणीय स्थळे:-
१)काळभैरव:-- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.
२)आदिमाया व आदिशक्ति:-- देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे.
३)घाटशीळ:-- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आंत देविच्या पादूका आहेत.घाट्शीळवर उभारून देविने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला.तेव्हा रामाने देविला ओळखले व तो म्हणाला’तु का आई’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत.जवळच मंदीर संस्थानने बांधलेली बाग आहे.तुळजापूर शहराच्या पश्चिमेस सोलापूर मार्गावर डोंगराच्या कडेला घाटात हे मंदिर बांधलेले आहे. या ठिकाणाला पुराणकालीन महत्व आहे. असे म्हटले जाते की प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह सीतेच्या शोधार्थ भटकत असताना या शिळेवर भवानी मातेने त्यांची परीक्षा घेतली व येथून रावणाच्या लंकेचा मार्ग दाखविला. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या घाटशिळे बद्दल भाविकांच्या मनात अपार श्रद्धा असून येथील रामाच्या मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक येतात. हे मंदिर बालाघाटच्या डोंगरकडेला निसर्गरम्य वातावरणात आहे. सध्या या तीर्थाच्या शेजारी शासनाने पर्यटन निवास बांधले असून, देवस्थानच्या वतीने एक सुंदर उद्यान निर्माण करण्यात आले आहे. तुळजापूरला येणारे भाविक घाटशिळेच्या रम्य व शांत परिसरास भेट देण्यास चुकत नाहीत.
४)पापनाश तीर्थ:-- हे एक तीर्थ असून पापनाशिनी: असे याचे प्राचीन नाव आहे.येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.देऊळ जुने पण मजबूत आहे.तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहराच्या दक्षिण दिशेला बालाघाट डोंगराच्या कड्यावर हे पापनाश तीर्थ आहे. या ठिकाणी एक जलकुंड असून यामध्ये स्नान केल्यास व्यक्तीची पापे नाश पावतात अशी भाविकांत श्रद्धा आहे. इंद्राने भवानी मातेच्या सांगण्यावरून या कुंडात स्नान करून पापमुक्ती मिळविली अशी पुराणात कथा आहे. तेंव्हापासून या तीर्थाचे नाव पापनाश तीर्थ पडले असे म्हणतात. या कुंडातील पाणी शरीराला व मनाला तजेला देणारे आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक या कुंडात स्नान करून शुद्ध होतात.
५)रामवरदायणी :--येथे रामवरदायनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सितेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असते या देविने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवीला.याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.
६)भारतीबूवाचा मठ:-- देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो.याचे मुळ पूरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सरिपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे.भारती बुवांचा मठ तुळजाभवानी मंदिराच्या पश्चिम बाजूस डोंगराच्या पायथ्याशी आहे. देवीचे निस्सीम उपासक भारती बुवा यांनी या मठाची स्थापना केली. मठाचा परिसर अतिशय शांत असून ध्यान धारणा करण्यासाठी भाविक या मठात जातात. या मठात तुळजाभवानी देवीचा प्रत्यक्ष संचार असे व देवी भारती बुवाबरोबर सारीपाटाचा खेळ खेळते अशी धारणा आहे. पूजेचे वेळी मठाच्या पश्चिम दरवाजातून देवीस हाक मारण्याची प्रथा आजही पाळली जाते.
७)गरीबनाथाचा मठ:--तुळजाभवानी मंदिरापासून जवळच गरीबनाथ बुवांचा माठ आहे. यास दशावतार मठ असे देखील म्हणतात. मठामध्ये भिंतीवर भगवान श्री विष्णूंच्या दहा अवतारांच्या प्रतिमा आहेत. हा मठ प्राचीन काळापासून अस्तिवात असून एक महान तपस्वी व देवीचे उपासक गरीबनाथ बुवा यांनी हा मठ स्थापन केलेला आहे. याच मठात हिंगलाज मातेची एक मूर्ती देखील आहे आणि या देवीचे मंदिर सातवाहन काळातील प्राचीन शहर तेर येथे देखील सापडले आहे. मठात योगासनांचे वर्ग भरविण्यात येतात आणि मठ सर्व भाविकां साठी खुला असतो. मठात देवीची नित्य पूजा - अर्चा चालू असते.. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.
८)नारायणगिरीचा मठ:-- हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथिल क्रांती चौकात आहे.
९)मंकावती तीर्थ:--मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे.असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेहि म्ह्णतात.यावर महादेवाची पिन्ड आहे.तसेच मोठे मारुति मंदीर आहे.मंकावती तीर्थाचेच दुसरे नाव विष्णू तीर्थ असे देखील आहे. भवानी मंदिराच्या ईशान्य दिशेस ही प्रचंड विहीर असून तिला अनेक पायर्‍या आहेत. या तीर्थास जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे असून विहिरीच्या आतल्या बाजूस मोठ्या कमानी असलेल्या ओवर्‍या आहेत. या कुंडातील पाणी हे गंगा, यमुना व सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमातील आहे असे मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी स्नान केल्यास काशी येथील गंगा नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते अशी भाविकात श्रद्धा आहे.
१०)धाकटे तुळजापूर:--येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव करते.तुळजापूर पासून सुमारे २ किलोमीटरवर धाकटे तुळजापूर असून या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे एक लहान मंदिर आहे. साधारण १९३९ साली, या परिसरातील एका शेतात नांगरणी चालू असताना जमिनीच्या खाली देवीची मूर्ती सापडली. गावकर्‍यानी देणगी जमा करून देवीसाठी मंदिर बांधले व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ही मूर्ती तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या मूर्ती सारखीच आहे. असे मानले जाते की, मूर्तिभंजक आक्रमकापासून मूर्तीचे रक्षण करण्यासाठी मूर्ती जमिनीत पुरून ठेवण्यात आली होती. शहराच्या कोलाहलापासून दूर या मंदिराचा परिसर अतिशय शांत व रम्य आहे व तुळजापुरास येणारे अनेक भाविक या मंदिरात मनःशांतीचा अनुभव घेण्यासाठी येतात.
     महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील उपासक होते.

✽ तुळजाभवानी मंदिरातील नित्य पूजा कार्यक्रम ✽

चौघडा : मंदिरात मोठी घंटा व नगार खाण्यात मोठे ढोल ,सनई असून ते सर्व पूजा सुरु होताच व पूजा संपेपर्यंत वाजवितात्त.घंटा सनई ढोल वाजविण्यास सुरवात होताच पुजारी/मानकरी/भक्त देवीच्या पूजा आरतीस उपस्थित होतात.
पूजा : प्रत्येक पूजा आरती वेळी पुजारी / मानकरी / भक्त देवीचे भाव पूर्ण गीत गातात.तसेच मानाकरी ताळ , दिमटी ,झांज वाजवितात. तसेच गोंधळी संभळ वाजवितात.
चरणतीर्थ : चरणतीर्थ हे सकाळी पाच -साडेपाच वाजता महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते होते.चरण तीर्थचे वेळी करवीर संस्थानाचा प्रतिनिधी उष्णोदक , अत्तर तेल , गंधलेय , सुगंधी चंदन , दुधखीर , तांबुल इत्यादी साहित्य घेऊन हजर होतो . याच साहीत्याने महंत स्वहस्ते देवीचे मुख्य चरण धुतात , यानंतर उपारकर या देविभक्तांच्या वंशज प्रतिनिधीतर्फे भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून नंतर करवीर संस्थांकडून आलेला दुध खिरीचा नैवैद्य दाखविण्यात येतो.
अभिषेक पूजा : सकाळी ६ वाजता देवीस पंचामृत अभिषेक घालतात.या वेळी देवीस मध , केळी , साखर , लिंबू आणि दही लावतात. स्नानाकरिता गोमुखाचे पाणी वापरतात.या पूजेच्या वेळी भक्त आपल्या इच्छेनुसार दुध दही यांचे सिंहासन पूजा,श्रीखंड तसेच आमरस , उसाचा रस यांनी स्नान घालून सिंहासन भरतात म्हणून याला सिंहासन पूजा असे म्हटले जाते. धुपारती : दुपारी पूजारी व भक्त देवीची आरती म्हणतात. ऊद कपूर लावून हि आरती केली जाते.
शेजारती व प्रक्षाळ : रात्री गोमुखाच्या पाण्याने प्रक्षाळ होते. यावेळी देवीच्या सिंहासनासह सर्व गाभारा धुवून काढला जातो.यावेळेस पुजारी भावपूर्ण पदे म्हणतात.
दैनंदिन पूजे नंतर देविस विविध प्रकारचे अलंकार घालण्यात येतात.देवीचा अलंकार खोली अत्यंत समृद्ध आहे. त्यात अनेक दागिने आहे , त्यातले काही शिवकालीन आहेत तर काहीचा कालखंड ज्ञात नाही. त्यातच शिवाजी महाराजांनी दिलेला सुवर्ण माळेवर एका बाजूला राजा शिवछत्रपती तसेच दुसऱ्या बाजूला जगदंबा प्रसन्न अशी अक्षरे कोरलेले आहे.या माळेत माळ १०१ मोहरा तसेच १०३ मणी आहेत.नवरात्र कालावधीत देवीस विशेष अलंकार पूजा करतात.

✽ श्री तुळजापूर मंदिर संस्थान ✽

मंदिराचे व्यवस्थापन श्री तुळजापूर मंदिर संस्थान यांचे कडे आहे. संस्थानची नोंदणी मुंबई सार्वजनिक कायदा, १९५०, अन्वये विश्वस्त संस्था म्हणून १९६२ साली झाली. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली पदसिद्ध विश्वस्त समिती असून त्यामध्ये विश्वस्त सदस्य म्हणून मा. उप-विभागीय अधिकारी, उस्मानाबाद,मा. आमदार, तुळजापूर,मा. नगराध्यक्ष, तुळजापूर आणि तहसीलदार, तुळजापूर यांचा समावेश आहे.